बीड

जागतिक आरोग्य संघटनेचा कोरोनाच्या नवीन व्हेरिएन्ट बद्दल इशारा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

26 June : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डेल्टा नावाच्या कोरोनच्या व्हेरियंट मुळे धुमाकूळ घातला होता. ऑक्सिजन व्हा कमतरतेने हजारो लोकांचे प्राण गेले.या विषाणूमुळे प्रतिकारशक्ती एकदम कमी होते.भारतातील १० राज्यात या प्रकारचा विषाणू आढळला आहे. याचे २० रुग्ण आढळून आल्याने चिंता आणखीनच वाढली असून ज्यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना पण डेल्टा प्लस व्हेरियंट डोखदायक आहे.जागतिक आरोग्य संघटना चे प्रमुख डॉ. टेड्रॉस यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचं गांभीर्य विषद केलं.

“पहिल्यांदा भारतात आढळून आलेल्या करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचे जगातल्या जवळपास ८५ देशांमध्ये रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत सापडलेल्या करोना व्हेरिएंटमध्ये हा प्रकार सर्वाधिक वेगाने संक्रमण होणारा प्रकार आहे. आपण सगळ्यांनी सार्वजनिक आरोग्य आणि करोनासंदर्भातल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे. त्यासोबतच या विषाणूला थांबवायचं असल्यास जगातल्या सर्वच देशांमध्ये समान पद्धतीने लसींचा पुरवठा व्हायला हवा”, असं टेड्रॉस यावेळी म्हणाले.

व्यापक लसीकरणाची गरज त्यांनी व्यक्त केली. हे लसीकरण जगातल्या सर्वच देशांमध्ये व्हायला हवं, अस त्यांनी नमूद केलं. यावेळी श्रीमंत देशांमध्ये होत असलेल्या गर्दीवर देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली. “तुम्ही या देशांमध्ये कुठेही गेलात तर तुम्हाला गर्दी दिसेल. जणूकाही साथ नाहीच आहे. मग तुम्ही ज्या देशांमध्ये लसींचा पुरवठा पुरेसा झालेला नाही अशा देशांमध्ये जा. तिथे तुम्हाला लॉकडाउन दिसेल”, असं टेड्रॉस यांनी सांगितलं.