मराठवाडा

कर्करोग रुग्णाचे उपचार आता मराठवाड्यात होणार

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

26 June : राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज जालना येथे शासकीय महिला रुग्णालयात उद्योजकाचे दायित्व व राज्य शासनाच्या आर्थिक साहायाने कोबाल्ट युनिट सुरु करण्यात येण्यात ते म्हणाले.मुंबई येथील टाटा कर्करोग रुग्णालयाच्या सहकार्याने जालना येथील शासकीय महिला रुग्णालयात कर्करोग रुग्णांसाठी बाह्य़ उपचार केंद्रांचा प्रारंभ टोपे यांच्या हस्ते झाला.

त्यावेळी ते म्हणाले, औरंगाबाद येथील शासकीय कर्करोग रुग्णालयात ‘स्पॉक मॉडल’ म्हणून जालना येथील बाह्य़ उपचार केंद्र काम करणार आहे. त्यासाठी टाटा ट्रस्टच्या रुग्णालयाचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळणार आहे. औरंगाबाद येथील शासकीय कर्करोग रुग्णालयात निदान झाल्यावर रेडिएशनसाठी रुग्णांना ३० ते ३५ कोटी खर्च करून कर्करोग रुग्णांसाठी कोबाल्ट युनिट उभारण्यात येणार आहे.
आरोग्य विभागाच्या स्वयंचलित रसायन विश्लेषण यंत्रसामुग्रीचे उद्घाटनही टोपे यांच्या हस्ते झाले. या माध्यमातून एका तासात ५० रुग्णांच्या ३६० चाचण्या होणार आहेत.जालना जिल्हा शासकीय रुग्णालयातील हवेतून प्राणवायू घेणाऱ्या ८० लाख रुपये खर्चाच्या प्रकल्पाचे उद्घाटनही टोपे यांच्या हस्ते झाले.