महाराष्ट्रराजकारण

राष्ट्रवादीच्या आमदाराची आंतरराष्ट्रीय पातळीवर दाखल

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

25 June : महाराष्ट्रातील आमदाराची कोरोना काळात केलेल्या कामाची दाखल आता अंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात अली आहेपारनेरमधील नागरिकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी उभारलेलं एक हजार बेड्सचं करोना केंद्र साऱ्या महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये चर्चेचा विषय ठरलं. लंके यांच्या या कामाची दखल आता थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून त्यांना एक प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय.

करोना काळात केलेल्या कामाबद्दल आज मला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन या आंतरराष्ट्रीय पुरस्कराने सन्मानित करण्यात आले. माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला हा सन्मान मिळाला ही खूप मोठी गोष्ट आहे. हे सगळं शक्य झालं माझ्यावर प्रेम कऱणाऱ्या मायबाप जनतेमुळे आणि सहकाऱ्यांमुळे”, असं लंके यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये समावेश झाल्याने आमदार लंके यांनी करोना संकटकाळात केलेल्या सातत्यपूर्ण कामाला जागतिक परिमाण प्राप्त झाले आहे.‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये समावेश झालेले नीलेश लंके देशातील पहिले आमदार ठरले आहेत