देश विदेश

चीनची भारतीय सीमेवर आगळीक

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

25 June : चीनने १९६२ च्या युद्धानंतर भारतीय सीमेनजीक जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत.याचीच अनुभुती आता यायला लागलीय अरुणाचल प्रदेश सीमेलगत चीनने पहिली बुलेट ट्रेन सुरु केली आहे. सविस्तर बातमी असे कि तिबेट ची राजधानी ल्हासा ते अरुणाचल प्रदेशातील न्यिंगची दरम्यान हि ट्रेन चालू करण्यात आली .

आक्रमक विस्तारवादी भूमिका घेणाऱ्या चीनकडून सीमेलगतच्या भागात मोठ्या प्रमाणावर पायाभूत विकासाची कामे सुरू आहेत. रस्तेबांधणी, रेल्वेचे जाळेही चीनकडून विस्तारण्यात येत आहे.सिचुआन-तिबेट रेल्वे अंतर्गत ४३५.५ किमी अंतराच्या ल्हासा-न्यिंगची सेक्शनचे उद्धघाटन एक जुलै होणार होते. मात्र, त्याआधीच बुलेट ट्रेन धावू लागली आहे. एक जुलै रोजी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा स्थापना दिवस असून शताब्दी वर्षाला सुरुवात होणार आहे.किंघई-तिबेटनंतर सिचुआन-तिबेट रेल्वे हा दुसरा रेल्वे मार्ग असणार आहे.

ही ट्रेन किंघई-तिबेट पठाराच्या दक्षिण-पूर्व मार्गावरून धावणार आहे. हा भाग भूगर्भीयदृष्ट्या अधिक सक्रिय असलेल्या क्षेत्रांपैकी एक आहे.चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अधिकाऱ्यांना हा रेल्वे मार्ग पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. या रेल्वे मार्गामुळे चीनच्या सीमा भागातील सुरक्षेत अधिक स्थिरता आणण्यास महत्त्वाची भूमिका बजावेल.या रेल्वे मार्गामुळे भारतासमोरील आव्हान वाढले असल्याचे विश्लेषक सांगतात. या रेल्वे मार्गाचा चीनला मोठा फायदा होणार आहे. अरुणालचल सीमेलगतच्या भागात तणाव निर्माण झाल्यास चीनला सैन्य आणि इतर संरक्षण साहित्य तातडीने पोहचवता येणार आहे.