राजकारणमहाराष्ट्र

भाजप नेते नारायण राणे यांची राष्ट्रवादीवर टीका

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप


25 June : नारायण राणेंनी राष्ट्रवादिवर टीका केली ते म्हणाले आपण जे करतो त्या प्रमाणे आपल्याला भरावे पण लागते.अनिल देशमुखांच्या विरोधात झालेली ईडीची ही कारवाई कायदेशीर कारवाई आहे. ही कारवाई राजकीय स्वरुपाची नाही.जे केले आहे त्याची चौकशी सुरू आहे. त्यामुळे आता यात कोणी राजकारण आणू नये.

राष्ट्रवादी काँग्रेसने तर करूच नये. आता हे सिद्ध होऊ द्या आणि बाहेर येऊ द्या, काय आहे ते मग बघू’.भाजप नेते, माजी खासदार किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिवहन मंत्री अनिल परब, रविंद्र वायकर आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, राज्यमंत्री रविंद्र वायकर आणि मिलिंद नार्वेकर यांनी रायगड जिल्ह्यात भव्य बंगले आणि रिसॉर्ट बांधले आहेत. या बंगल्यांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केली आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांची अनिल देशमुख यांच्यासारखीच अवस्था होणार असल्याचेही सोमय्या म्हणाले.माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापे मारले आहे. अनिल देशमुख यांच्यावर ज्या प्रकारचे आरोप आहेत, तसेच आरोप परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर देखील आहेत. मात्र हे दोघेही प्यादे आहेत. यातील खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसले आहेत असे आरोप भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांची नावे न घेता केले आहेत.