भारत

आता ‘ह्या’ महिलांना दिली जाऊ शकते लस

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

25 June : देशात डेल्टा नामक कोरोनाच्या विषाणूने थैमान घातले होते .दुसरी लाट याच प्रकारच्या कोरोनाच्या विषाणूचा परिपाक आहे.आता हा विषाणू आटोक्यात येतो का नाही तर याचा नवीन वारीत डेल्टा प्लस ने डोके वर काढले आहे.कोरोनाची तिसरी लाट भारतात येण्याची शक्यता वर्तविली आहे त्यामुळे देशात सध्या चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर गर्भवती महिलांच्या लसीकरणाबाबत अनेक संभ्रम लोकांच्या मनात आहेत. परंतु इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रेषेवरच ने हे संभ्रम दूर केले असून गर्भवती महिलांना कोरोना लस दिली जाऊ शकते, असे सांगितले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रेषेवरच चे बलराम भार्गव म्हणाले, आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या गाईडलाईनुसार गर्भवती महिलांना लस दिली जाऊ शकते. लसीकरण गर्भवती महिलांसाठी उपयुक्त असून त्यांनी ते करावे.

आम्ही 2 ते 18 वर्षाच्या मुलांवर अभ्यास सुरू केला आहे. त्याचा अहवाला संप्टेबरपर्यंत आमच्याकडे येईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील मुलांच्या लसीकरणाबद्दल डाटा नाही. त्यामुळे लहान मुलांना या लसीची आवश्यकता आहे का? हा देखील एक प्रश्न आहे.अमेरिकेतील बायोटेक कंपनी नोवावाक्स आणि पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या भागिदारीतून तयार करण्यात येणाऱ्या कोओवॅक्स या कोरोना लसीच्या उत्पादनाची सुरुवात झाली आहे. याबाबत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं ट्वीट करत माहिती दिली आहे. ‘हा एक माईलस्टोन आहे. या आठवड्यात आम्ही पुण्यातील कंपनीत कोवोवॅक्सची पहिली बॅच सुरू केली’, असं ट्वीट सीरमकडून करण्यात आलं आहे. ‘हा एक माईलस्टोन आहे. या आठवड्यात आम्ही पुण्यातील कंपनीत कोवोवॅक्सची पहिली बॅच सुरू केली’, असं ट्वीट सीरमकडून करण्यात आलं आहे. या ट्वीटसोबत सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी बॅचसह एक फोटो देखील टाकला आहे. कोवॅक्स लस कोरोनाच्या ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका व्हेरिएन्ट विरोधात 89 टक्के कार्यक्षम असल्याचा दावा या कंपनीने केला आहे. सप्टेंबर 2021 पर्यंत ही कोरोना प्रतिबंधक लस बाजारात येण्याची शक्यता आहे अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांनी याआधीच दिली होती.