महाराष्ट्र

कोरोना निर्बंध संबंधी आले आरोग्यमंत्राचे निर्देश

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

25 June : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवल्यानंतर आता तिसरी लाटेची चाहूल आता जाणवू लागल्याने निर्बंध विषयी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे डेल्टा प्लस नावाच्या विषाणू वाढल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात कुठलेही निर्बंध लादले जाणार नाहीत असे ते म्हणाले.राज्यात डेल्टा प्लस प्रकारचा विषाणूचा पहिला रुग्ण रत्नागिरीत आढळला आहे.८० वर्षीय महिलेला या विषाणूची बाधा झाली आहे.१३ जून रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर त्यांना डेल्टा प्लस चे संक्रमण झाल्याची माहिती समोर येत आहे.पण यात शहानिशा करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.डेल्टा प्लसचे राज्यात असलेल्या 21 रुग्णापैकी 20 जणांना डिस्चार्ज दिला आहे. डेल्टा प्लसचे प्रमाण नगण्य असून खबरदारी म्हणून याचे प्रत्येक जिल्ह्यातुन डेल्टा प्लस साठी 100 सॅम्पल गोळा करून त्याची तपासणी करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.

सध्या डेल्टा प्लसमुळे कुठलेही चिंतेचे कारण नसून त्यामुळे राज्यात कुठेही निर्बंध लावले जाणार नसल्याचे देखील आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.या महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. डेल्टा प्लसने मृत्यू झालेल्या महिलेला इतरही आजार होते. त्यामुळे मृत्यू नेमका कशामुळे झाला हे तपासले जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. डेल्टा प्लॅस व्हेरिएंटचे रूग्णांची रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नऊ संख्या असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यानंतर जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होणार का कडक होणार? याबाबतच चर्चा सुरू झाली आहे. याचवेळी आता रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर बाजारपेठेतील व्यापारी आक्रमक झाले असून त्यांनी थेट जिल्हा परिषद सीईओ डॉक्टर इंदूराणी जाखड आणि तहसीलदारांची गाडी अडवत त्यांना जाब विचारला होता.