News

लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढणार?

देशव्यापी चौथा लॉकडाऊन संपायला आता फक्त 2 दिवस राहिले आहेत. केंद्र आणि राज्य स्तरावर आता लॉकडाऊनसंबंधी आढावा घेतला जात आहे. 31 मे पर्यंतचा हा लॉकडाऊन संपल्यानंतर आणखी 15 दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो.

पाचवा लॉकडाऊन आणखी वेगळ्या स्वरुपाचा असू शकतो. त्यासंदर्भात केंद्रीय सचिव राजीव गौबा यांनी आज कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या महत्त्वाच्या 13 शहरांच्या आयुक्तांशी चर्चा केली. या नव्या लॉकडाऊनमध्ये जीम आणि मंदिरांना सुट दिली जाऊ शकते. मात्र मॉल्स, शाळा, कॉलेजेस यांना परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे संकेत केंद्राने दिली आहेत.

गौबा यांनी मुंबई, चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद, ठाणे, पुणे, हैदराबाद, कोलकाता, इंदौर, जयपुर, जोधपूर, चेंगलपट्टू आणि तिरुवल्लूर या शहरांच्या आयुक्तांशी चर्चा केली. प्रतिबंधित क्षेत्रात आणखी कडक उपाय योजना करा अशी सूचनाही राजीव गौबा यांनी केली आहे.

31 मे या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. याच कार्यक्रमादरम्यान मोदी लॉकडाऊन वाढवण्याबाबत घोषणा करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येतीये.