क्राईम

ऑनलाइन चा या अभिनेत्रीला फटका

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

24 June : कोराना काळात दारूची दुकानं बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. पण मिशन बिगीन अंतर्गत दारूची होम डिलिव्हरी करण्यास सरकारने परवानगी दिली होती. पण या काळात मद्य खरेदी करण्याच्या नावे अनेकांना ऑनलाईन लुबाडलं गेल्याच्या घटना समोर आल्या होत्या. महाराष्ट्रात दारूची दुकानं खुली करण्यास बऱ्याच दिवसांपासून परवानगी मिळाली आहे. मात्र, दारूच्या होम डिलिव्हरीच्या नावे अजूनही ऑनलाईन फसवणूक होत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे प्रख्यात अभिनेत्री शबाना आझमी यांना हा अनुभव आला आहे.

त्यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहित माझी ऑनलाईन फसवणूक झालीय. मी गुरुवारी मधून ऑनलाईन ऑर्डर दिली होती. विशेष म्हणजे मी पैसेही आधीच दिले होते. पण अद्याप मला डिलिव्हरी मिळालेली नाही. आता तर त्या लोकांनी माझा फोन घेणंही बंद केलं आहे”, असं शबाना आझमी ट्विटरवर म्हणाल्या .शबाना आझमी यांच्या ट्विटला कडून रिप्लाय देण्यात आला आहे. “मॅडम, गुगलवर मद्यविक्री करणाऱ्या दुकानांचे जे नंबर दाखवले जातात ते 99 टक्के खोटे असतात. तुमची कडून फसवणूक झालेली नाही तर इतर ठगबाजांनी तुमची फसवणूक केली आहे.

कृपया पोलिसात तक्रार दाखल करा आणि लोकांनाही याबाबत जागृत करा, अशी प्रतिक्रिया कडून देण्यात आली आहे.दरम्यान, शबाना आझमी यांची फसवणूक करणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्यात मुंबई पोलीस आणि सायबर क्राईमच्या अधिकाऱ्यांना यश आलं आहे. शबाना आझमी यांनी स्वत: याबाबत ट्विट करुन माहिती दिली. मला फसवणारे अखेर सापडले आहेत. त्यांचा सोबत काहीच संबंध नाही. मी मुंबई पोलीस आणि सायबर क्राईमला विनंती करते की त्यांच्यावर अशी कारवाई करा जेणेकरुन ते मोठमोठ्या कंपन्यांच्या नावाने लोकांची फसवणूक करणार नाहीत, असं शबाना आझमी म्हणाल्या.