भारत

जम्मू व काश्मीर विषयी केंद्राची सर्वपक्षीय बैठक

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

24 June : ५ ऑगस्ट २०१९ रोजी मोदी सरकारने जम्मू व काश्मीर या राज्याला महत्वपूर्ण दर्जा देणारे ३७० कलम हटवले.या घटनेला दोन वर्ष होत आहेत यानंतर जम्मू व काश्मीरचे विभाजन दोन प्रदेशात करण्यात आले.या काळात इंटरनेट व दळणवळण सेवा बंद करण्यात आल्या तसेच अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले .जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील ८ प्रमुख राजकीय पक्षांच्या १४ नेत्यांसोबत चर्चा केली. जवळपास साडेतीन तास या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काश्मिरी नेत्यांची बैठक झाली.

बैठकीत माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, महबूबा मुफ्ती आणि काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.बैठकीत फारुख अब्दुल्ला, महबूबा मुफ्ती, उमर अब्दुल्ला, गुलाम नबी आझाद, रविंद्र रैना, कवींद्र गुप्ता, निर्मल सिंह, सज्जाद लोन, भीम सिंह या नेत्यांची उपस्थिती होते. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, एनएसए अजित डोवाल, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासह केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.या बैठकीला पंडितांनी विरोध देखील केला.