बीडराजकारण

मराठा आरक्षणावरून बीड मधील ‘हा’ नेता उतरणार रस्त्यावर

24 June : मराठा आरक्षणाचे पडसाद राज्यभरात उमटत असतानाच संभाजीराजे यांनी ठाकरे सरकारला अल्टिमेटम देखील दिला आहे.आता मराठा समाज देखील आक्रमक झाला असून भाजपचे नेते आमदार सुरेश धस याच कळीच्या प्रश्नावर चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतेय.त्यांनी सोमवारी मोर्चा काढला जाणार याची घोषणा केली .देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याचा निर्णय दिला. यानंतर राज्यातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याचे पाहायला मिळतेय.. मराठा आरक्षणासाठी सोमवारी मोर्चा काढला जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

बीडमध्ये आज पत्रकार परिषद घेत आमदार धस यांनी याविषयी माहिती दिली आहे.सुरेश धस म्हणाले की, ‘मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचा हलगर्जीपणा आहे. आता राज्याने विनंती याचिका केली आहे. त्यात योग्य माहिती द्यावी, पाठपुरावा करावा यासाठी सोमवारी रोजी बीडमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. सोमवारी निघणारा हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा राहणार आहे. यात मराठा आरक्षणासोबतच पिक कर्ज तातडीने वाटप व्हावे. पिक विम्याच्या बाबतीत बीड पँटर्न उलटा चाललाय, यात दोषींवर कारवाई करुन पिक विमा मिळवून द्यावा. उसतोड मजुर, मुकादम यांच्यासाठी कायदा करावा, 66% भाववाढ द्यावी.

कोवीडच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी पात्र कर्मचाऱ्यांना आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या भरतीत थेट नियुक्ती द्यावी अशा मागण्या केल्या जाणार आहेत.’पुढे बोलताना आमदार धस म्हणाले की, आरोग्य विभागाच्या भरतीत नवे लोक घेण्यामध्ये काही तरी गौडबंगाल आहे. यात आरोग्यमंत्र्यांचा हेतु दुषीत आहे. वाळुघाटावरुन घरकुलांसाठी 5 ब्रास वाळु द्यावी. कोवीड बळींच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी. रेल्वे, रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, पाझर, गाव, मध्यम, लघु व मोठ्या जलसिंचन भुसंपादनाचा मावेजा तातडीने मिळावा. या मागण्यांसाठी 28 जून रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पत्रकार परिषदेपूर्वी या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.