राजकारणमहाराष्ट्र

या बड्या नेत्याच्या घरात ओबीसी आरक्षणावरून कलह

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

24 June : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून रणकंदन पेटले त्यावरून बड्या नेत्यांनी चक्काजॅम आंदोलनाचा देखील इशारा सरकारला दिला आहे.असेच एक राजकीय प्रस्थ असेलेले ज्यांना महाराष्ट्र नाथाभाऊं नावाने ओळखतो त्यांच्याचकुटुंबात ओबीसी आरक्षणावरून वाद निर्माण झाले आहेत.खडसे कुटुंबात नणंद व भावजय यांच्यात यावरून शाब्दिक चकमक झडली आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहीणी खडसे यांनी, ‘भाजपाला ओबीसींचा कधीपासून कळवळा यायला लागला’ या आशयाचे ट्वीट केले असता त्यावर खडसे यांच्या स्नुषा व भाजप खासदार रक्षा खडसे यांनी, ‘रोहिणी खडसे सत्ताधारी राष्ट्रवादीच्या सदस्या असल्याने त्यांना पक्षाने सांगितले म्हणून त्या बोलत असाव्यात’, असा टोला लगावला आहे.भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या एकनाथ खडसे यांच्या घरातही ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन नणंद- भावजय यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत खुल्या वर्गातून भाजपतर्फे सर्व ओबीसी उमेदवारांना तिकीट देऊ अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. यानंतर एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ‘भाजपला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता? आता गळा काढण्यात अर्थ नाही’, असे ट्वीट रोहिणी यांनी केले आहे.रोहिणी खडसे यांच्या या टीकेला एकनाथ खडसेंच्या स्नुषा आणि भाजप खासदार रक्षा खडसे यांनीही पत्रकारांशी बोलताना जोरदार उत्तर दिलं आहे. रोहिणी खडसे या सत्ताधारी पक्ष राष्ट्रवादीच्या सदस्या आहेत. त्यांच्या पक्षाने त्यांना सांगितलं आहे, तसे त्या बोलत आहेत, अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. राजकारण बाजूला ठेऊन सत्ताधारी पक्षाने ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी टीप्पणीही रक्षा खडसे यांनी पुढे जोडली. नाना पटोले हे ओबीसी नेते आहेत, सत्ताधारी पक्षाचे प्रमुख आहेत. ओबीसी समाजाची दिशाभूल न करता त्यांनी राज्य सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडणे आवश्यक असल्याचेही खासदार खडसे यांनी सांगितले.