भारत

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत या दिग्गज गुंतवणूकदारा ने केला दावा…!

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

22 June : ज्यांना आपण भारताचे वॉरेन बफेट म्हणतो असे महान गुंतवूणकदार व शेयर बाजाराचे मोठे जाणकार राकेश झुझुनवाला यांनी एक मोठा दावा केला आहे. त्यांनी कोरोनाबाबत हा दावा केला ;कोरोनाची तिसरी लाट भारतात येणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे.ते म्हणाले तुम्हाला मी पैजेवर पैसे लावून सांगायला तयार आहे की भारतामध्ये तिसरी लाट येणार नाही.करोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे शेअर बाजारामध्ये मंदी येण्याची भीती गुंतवणूकदारांमध्ये आहे. याचसंदर्भात बोलताना गुंतवणुकदारांनी घाबरण्याची आणि तिसऱ्या लाटेमुळे मंदी येईल यासंदर्भात चिंता करण्याची गरज नसल्याचं झुनझुनवाला यांनी सांगितलं आहे. “कोणीही दोन लाटांचं भाकित व्यक्त केलं नव्हतं. मात्र आता सगळेजण तिसऱ्या लाटेची भविष्यवाणी करत आहेत. सध्या ज्या वेगाने लसीकरण सुरु आहे ते पाहता आपल्या सर्वांना हर्ड इम्युनिटी मिळेल.

त्यामुळेच तिसरी लाट येण्याची शक्यता मला तरी वाटत नाही,” असं झुनझुनवाला यांनी आपलं मत मांडतानापुढे बोलताना झुनझुनवाला यांनी तिसऱ्या लाटेचा अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नाही असं मतही व्यक्त केलं आहे. मात्र काही बदल करण्याची गरजही झुनझुनवाला यांनी बोलून दाखवलीय. “लाट येवो अथवा न येवो भारतीय अर्थव्यवस्था ही कोणत्याही संकाटाचा सामना करण्यासाठी तयार आहे. तिसरी लाट येणार नाही यासाठी मी पैजेवर पैसे लावण्यासाठीही तयार आहे. सोशल नेटवर्किंगवर सर्वच हुशार लोक तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करत असल्याने आपण घाबरुन गेलो आहोत. आपण सतर्क राहून काळजी घेतली पाहिजे. मात्र मला वाटत नाही की तिसरी लाट येईल,” असं झुनझुनवाला म्हणालेत.