केंद्राचा कोरोनाबाबत ‘या’ राज्यांना इशारा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
22 June : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात हाहाकार! माजवला,या लाटेत कोरोनाचा म्युटंट व्हेरियंट डेल्टा हा विषाणू अति संक्रमण कारक असून वेगाने पसरून सर्दी, खोकला,असे लक्षणे दाखवत रूप दाखवत आहे.ब्लॅक,व्हाईट ,येलो फंगस पाठोपाठ या करोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका निर्माण झाला आहे.
सध्या विषाणूच्या या प्रकाराचे देशात फारसे रुग्ण जरी नसले, तरी त्याची क्षमता आणि त्याच्या प्रसाराचा वेग पाहाता केंद्र सरकारने देशातील तीन राज्यांना तातडीने पावलं उचलण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांचा समावेश आहे. या तीनही राज्यांमध्ये करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे विषाणू रुग्णांमध्ये आढळून आले असून त्यांना वेळीच आवर घालण्यासाठी केंद्राने या राज्यांना पावले उचलायचे आदेश दिले आहेत.