बघा! लसीकरणाबाबत राज्य सरकारची महत्वाची घोषणा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
21 June : राज्यसरकाराने लसीकरण बाबत मोठा निर्णय घेतला आहे.याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.राज्य कोविड लसीकरण मोहिमेत सातत्याने आघाडीवर राहिलं आहे. आता पुढचं पाऊल टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली.राज्यातील कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला वेग द्यायचा असल्याने १८ वर्षांवरील सर्व वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला राज्य सरकार मान्यता देत आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे असे आवाहन मी महाराष्ट्रातील तरुणाईला करत आहे, असेही टोपे म्हणाले.
सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील १८ ते ३० या वयोगटालाही खूप मोठा दिलासा मिळणार आहे.दरम्यान, १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण मोहिमेची जबाबदारी केंद्र सरकारने राज्य सरकारवर टाकली होती. मात्र, त्यात सुसूत्रता आणण्यासाठी लसीकरण धोरणात बदल करत संपूर्ण देशात केंद्र सरकार मार्फत १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचेही मोफत लसीकरण करण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली होती. २१ जून रोजी योग दिनापासून हे मोफत लसीकरण सुरू करण्यात येईल असे मोदी यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार आजपासून नव्या धोरणानुसार लसीकरण सुरू झाले असून पहिल्याच दिवशी तब्बल ८० लाखांवर नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.