महाराष्ट्र

राज्यातील कोरोनाची परिस्थिती सुधारली

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

21 June : महाराष्ट्रात कोरोना संक्रमितांची संख्या कमी होताना दिसत आहे .आज आलेल्या आकडेवारीवरून कोरोना रुग्ण वाढीची घाट झाली असून आणि कोरोनातून बरे होणाऱ्यांची वाढ होत आहे.रिकव्हरी रेट खूप जास्त पण ९५ टक्के एव्हडा झळा आहे. करोना प्रमाण कमी होताना दिसत आहे. करोनाबाधितांच्या तुलनेत अनेक दिवसांपासून करोनामुक्त होत असलेल्यांची संख्या अधिक आढळून येत आहे. राज्यात आज दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा दुप्पट अधिक रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर, राज्याचा कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. राज्यभरात आज ६ हजार २७० नवीन करोनाबाधित आढळले असून, १३ हजार ७५८ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, ९४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ५७,३३,२१५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५टक्के एवढे झाले आहे.