आता ‘हा’ राष्ट्रीय पक्ष येणार रस्त्यावर
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
21 June ; देशातील सर्वात मोठा पक्ष असलेला काँग्रेस ही आता सर्वसामान्य लोकांच्या अत्यन्त अशा कळीच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरणार आहे. महागाईच्या झळा ह्या देशाच्या जनतेच्या खिशाला कात्री लावणाऱ्या आहेत .पेट्रोल,डिझेल,गॅस चे भाव गगनाला भिडले असताना सर्वसामान्यांशी संबंधित महागाईच्या मुद्यावर कॉंग्रेस पक्ष रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहे. काँग्रेस च्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी यांनी ही बैठक बोलावली असून केंद्रातील मोदी सरकारला घेराव घालण्यासाठी या बैठकीत कॉंग्रेसचे बडे नेते पेट्रोल-डिझेल आणि महागाईच्या वाढत्या किंमतींविरोधात आंदोलन करण्याची रणनिती आखू शकतात.
काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेसने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींविरूद्ध देशव्यापी निदर्शने केली. पण पेट्रोल आणि डिझेलचे दर सतत वाढत आहेत आणि बऱ्याच राज्यात पेट्रोल प्रतिलिटर 100 रुपयांच्या पुढे गेले आहे. अशा परिस्थितीत कॉंग्रेस पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहे.सूत्रांच्या माहितीनुसार कोरोना संसर्गासंदर्भात कॉंग्रेसकडून सुरू करण्यात आलेल्या सर्वेक्षणावरही चर्चा करण्यात येणार आहे. याशिवाय आगामी विधानसभा निवडणुकांसारख्या मुद्द्यांसह सद्यस्थितीतील घडामोडी आणि इतर राजकीय परिस्थितीवरही चर्चा होईल. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणारी ही बैठक 24 जून रोजी सुरू होईल.
दुसरीकडे पुढील लोकसभा निवडणुकीला अजून तीन वर्षे आहेत पण राष्ट्रीय राजकारणात विरोधी पक्षनेत्यांची एक जूट बांधण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत आणि या सगळ्यांच्या केंद्रस्थानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आहेत. दोन दिवस त्या दृष्टीने दिल्लीत महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. 11 जूनला मुंबईत आणि आज दिल्लीत. पाठोपाठ उद्या राष्ट्रीय राजकारणातले 15 विरोधी पक्ष नेते शरद पवारांच्या घरी एकवटत आहेत. यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय मंचाच्या बॅनरखाली हे सगळे विरोधी पक्ष एक येत आहेत.