भारत

आता आला बुरशी चा नवीन प्रकार

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

20 June : पांढरी बुरशी, काळी बुरशी, पिवळी बुरशी नंतर आता बुरशीचा वेगळा प्रकार आढळून आला आहे.आता देशात प्रथमच हिरव्या बुरशीचा रुग्ण आढळून आला आहे देश कोरोना व्हायरससारख्या महामारीचा सामना करत आहे. त्यात आता दुसरं संकट उभं ठाकलं आहे.

काळ्या बुरशीचा धोका असताना हिरव्या बुरशीचा धोका उद्भवला आहे. देशात हिरव्या बुरशीचाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. पंजाबमध्येहिरव्या बुरशीच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली आहे.कोविड -19 मधून बरे झालेल्या एका व्यक्तीमध्ये हिरवी बुरशी आढळून आली आहे. जालंधर येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

रुग्णाला खोकला सुरु झाला त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाधित रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत होता. तसंच रुग्णाच्या छातीतही वारंवार दुखत होतं. पंजाब राज्यात यापूर्वी राज्यात हिरव्या बुरशी च्या रुग्णांबद्दल बातमी आली होती. मात्र ते स्पष्ट झालं नव्हतं.जालंधर जिल्हा सिव्हिल रुग्णालयाचे साथीचा रोग विशेषज्ञ, डॉ परमवीर सिंग यांच्या मते.

यापूर्वी या रुग्णाला कोरोनाचीही लागण झाली होती. रुग्ण नुकताच कोरोनामुक्त झाला होता. सध्या त्याला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले आहे. मात्र रुग्णाची स्थिती स्थिर आहे का हे निश्चित सांगता येणार नाही.