बीड

वेदनादायक ! मुलाकडून जन्मदात्यांना मारहाण

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

20 June : बीड मधील ही घटना असून मुलाकडून आई व वडील यांना मारहाण करण्यात आली.ही घटना जिल्ह्यातील घाटशीळ पारगाव येथील आहे. आज फादर डे असताना अमानुषपणे मुलाकडून जन्मदात्याना मारहाण करण्यात आली या दिवशी खरंतर आई वडिलांचे ऋण व्यक्त केले पाहिजे पण अशी बेजवाबदार अशी मारहानं माणुसकीचे किळसवाणे कृत्य आहे.

बीड जिल्ह्यातील घाटशिळ पारगाव येथील बाबासाहेब खेडकर या विकृत व्यक्तीने आपल्या आई-वडिलांना शनिवारी सायंकाळी चारच्या दरम्यान काठीने बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे मारहाण करत असताना चा व्हिडिओ गावातीलच एका व्यक्तीने शूट केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने घाटशिळ पारगाव येथील बाबासाहेब खेडकर यांचा विकृतपणा चव्हाट्यावर आला आहे. या संदर्भाने अद्याप पर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. बाबासाहेब खेडकर हा चक्क काठीने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना मारहाण करत आहे. असे कृत्य तो सतत अधून मधून करत असतो असे येथील काही ग्रामस्थांनी सांगितले.

मात्र नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यामध्ये बाबासाहेब खेडकर याची आई शिवबाई खेडकर हिचा मृत्यू झाला आहे. तर वडील नगर येथील दवाखान्यात उपचार घेत असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.विचारले असता बीड पोलिसांकडूनयोग्य ती कारवाई केली जाईल सांगण्यात आले.