जालन्यात पुन्हा पाच पॉझिटिव्ह,संख्या 115 वर पोहचली
जालना- (प्रतिनिधी)-जालना जिल्ह्यात आणखी पाच नवीन पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 115 वर पोहचली आहे. जालना तालुक्यातील नूतनवाडी येथील तीन ,परतूर येथील एक, आणि मंठा तालुक्यातील कानडी येथील एक याप्रमाणे पाच रुग्णांचे अहवाल आज गुरुवारी सायंकाळी प्राप्त झाले असून आता जिल्ह्याची एकूण बाधित रूग्णांची संख्या 115 वर पोहचली असून गेल्या काही दिवसात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्यामुळे जिल्ह्यातील जनतेसह जिल्हा प्रशासन,आरोग्य यंत्रणा खडबडून जागे झाले आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मधुकर राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी, परिचरिकांनी घेतलेल्या परिश्रमामुळे आज गुरुवार पर्यंत कोरोना बाधित 25 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले असून या सर्व रुग्णांना सुट्टी देण्यात आल्यामुळे जिल्ह्याच्या दृष्टीने ही जमेची बाजू समजली जाते आहे*