‘या’ राज्याने आणले लोकसंख्या नियंत्रणासाठी नवीन धोरण
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
19 June : ईशान्य भारतातील आसाम या राज्यात भारतीय जनता पार्टी च्या नेतृत्वामध्ये दुसऱ्या टर्ममध्ये सरकार आले.मुख्यमंत्री म्हणून हेमंत बिस्वा शर्मा यांची नियुक्ती करण्यात आल्या नंतर लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी दोन अपत्य धोरण आणले आहे .या धोरणाची आमल बजावणी टप्याने करण्यात येणार असून त्याला अपवाद देखील असणार आहेत .
राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या काही विशिष्ट योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आसाम सरकार टप्प्याटप्प्याने दोन-अपत्ये धोरणाची अंमलबजावणी करणार असल्याचे शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री हिमंत विश्वा सरमा यांनी सांगितले.तथापि, प्रस्तावित लोकसंख्या नियंत्रण धोरण आसाममधील सर्व योजनांसाठी त्वरित लागू होणार नाही कारण काही योजनांचे लाभ केंद्र सरकारकडून दिले जातात, असेही सरमा यांनी येथे एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
परंतु राज्य सरकारने एखादी गृहनिर्माण योजना सुरू केली तर त्यासाठी दोन-अपत्ये धोरणाची अंमलबजावणी केली जाऊ शकते, त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा निकष राज्य सरकारच्या सर्व योजनांसाठी लागू होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.विरोधकांनी सरमा यांना यांच्या कुटुंबातील सदस्य संख्येवरून लक्ष्य केले, त्यावर सरमा यांनी टीका केली. सरमा पाच भावंडांच्या कुटुंबातील आहेत.