खळबळजनक ! पित्याची मुलींसह आत्महत्या
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
19 June : एक हृदयविदारक अशी बातमी फादर्स डे च्या दिवशी घडली. कर्नाटकातील बेळगावी येथील हि घटना असून पित्याने आपल्या दोन मुलींसह आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील पोगत्यानट्टी गावात घडली आहे. दिवशीच पित्याने आपल्या दोन तरुण मुलींसह आत्महत्या केल्याच्या घटनेने पोगत्यानट्टी ग्रामस्थ देखील धक्का बसला आहे .आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव काडप्पा रंगापुरे (42) असे असून मुलींची नावे कीर्ती (20) आणि स्फूर्ती (18) अशी आहेत. या तिघांनीही घरात गळफास घेवून आत्महत्या केली. काडप्पा यांची पत्नी चन्नव्वा रंगापुरे यांचे एक आठवड्यापूर्वी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. पत्नीच्या निधनाचा धक्का काडप्पा सहन करू शकले नाहीत. पत्नीच्या मृत्यूनंतर पुढे आपल्या कुटुंबाचे कसे होणार हीच काळजी त्यांना लागून राहिली होती. त्यामुळे काडप्पा यांनी आपल्या राहत्या घरीच दोन्ही तरुण मुलींसह गळफास घेवून आत्महत्या करून जीवन संपवले. आत्महत्येची घटना कळताच चिकोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. चिकोडी पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.