बीड

बीड पॅटर्न ला शेतकऱ्यांचा विरोध

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

19 June :बीड जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या पिकविम्याच्या पॅटर्न ची चर्चा महाराष्ट्रात नव्हे पूर्ण भारतात होत आहे .या पॅटर्न ची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना देखील देण्यात आली आहेपंतप्रधानांपुढे सादर केलेला पीक विम्याचे बीड पारुप फसवे आणि शेतक ऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवणारे आहे. कृषी व महसूलचे पंचनामे ग्रा धरून शेतकऱ्यांना तत्काळ पीकविमा द्यावा. अन्यथा पावसाळी अधिवेशनावर शेतकऱ्यासह धडक मारू असा इशारा पूजा मोरे यांनी दिला आहे.बीड जिल्ह्यतील तलवाडा (ता. गेवराई) येथे शनिवार, दि. १९ जून रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी बोंबमारो आंदोलन केले.

खरीप हंगाम २०२०—२१ मध्ये १७ लाख ९१ हजार ५२२ शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. यामध्ये शेतकरी, राज्य आणि केंद्राने मिळून जवळपास ७९८ कोटी ५८ लाख रुपये भरणा केला होता. त्यापैकी केवळ १९ हजार ३४४ शेतकऱ्यांना १२ कोटी १९ लाख रुपये भरपाई पोटी मिळणार आहेत. मग यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा आहे की विमा कंपनीचा असा प्रश्न पूजा मोरे यांनी उपस्थित केला. खरीप हंगामातील पिके जोमात होती. मात्र, अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. शासनाच्या वतीने झालेल्या पंचनाम्यात जवळपास ४ लाख ३२ हजार ७०३ शेतकऱ्यांची पिके बाधित असल्याचा अहवाल कृषी विभागाने राज्याला पाठवला. त्यामुळे पीक विमा कंपनीनेही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. पीक विमा कंपन्या आणि राज्य सरकारची मिलीभगत असल्याने कंपन्यांना आता शेतकऱ्यांना लुटण्याचा शासनमान्य परवाना मिळाल्याचा आरोप मोरे यांनी केला. प्रशासनाने केलेल्या नुकसानीचे पंचनामे ग्रा धरून त्यानुसार सरसकट शेतकऱ्यांना विम्याचा लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. गेवराईचे तहसीलदार, कृषी अधिकारी आणि विमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले.