मिल्खासिंग यांच्या नावाने पंजाब सरकार चालू करणार नवीन अध्यासन
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
19 JUNE : ज्यांना आपण ‘फ्लाईंग सिख’ या नावाने ओळखतो ते वेगवान धावपटू मिल्खासिंग यांचे नुकतेच निधन झाले .त्यांच्या स्मरणार्थ काँग्रेस पार्टी च्या पंजाब मधील कॅप्टन अमरिंदर सरकारने मोठा निर्णय घेतला असून पटियाला येथील महाराजा भूपिंदरसिंग पंजाब स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीत दिवंगत माजी खेळाडू मिल्खा सिंग यांच्या नावाने स्वतंत्र अध्यासन तयार केले जाणार आहे.
‘मोहालीतील एका रुग्णालयात मिल्खासिंग यांना दाखल करण्यात आले होते. करोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना बुधवारी जनरल आयसीयूत ठेवण्यात आले. अचानक ताप आल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. शिवाय त्यांच्या ऑक्सिजन पातळीतही घसरण झाली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी चंदीगड येथील मिल्खा सिंग यांच्या निवासस्थानी भेट दिलेल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले, मिल्खासिंग यांची कारकीर्द तरुण पिढीला प्रेरणा देईल आणि त्यांचा वारसा लोकांच्या हृदयात जिवंत राहील. त्यांचे निधन हे संपूर्ण देशासाठी मोठी हानी आहे आणि सर्वांसाठी हा एक दुःखद क्षण आहे.”
‘फ्लाईंग सिख’ उपाधी१९६० साली भारत-पाकिस्तान मैत्रीच्या निमित्ताने अॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत होणारे सामने वरकरणी मैत्रीपूर्ण वाटत असले, तरी ते प्रतिष्ठेचे होते. त्यामुळे जवाहरलाल नेहरु यांनी मिल्खा सिंग यांना या स्पर्धेत खेळण्याची विनंती केली होती. त्यावेळी मिल्खा भारतातील सर्वाधिक वेगवान धावपटू होते.