News

आज पुन्हा पाच पॉझिटिव्ह; जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 51 वर

बीड,(प्रतिनिधी):-बीड जिल्ह्याला कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. आज पाठवलेल्या 41 स्वॅब पैकी 5 जणांना कोरोना असल्याची माहिती लातूर येथील स्व.विलासराव देशमुख विषाणू संशोधन व निदान संस्थेने दिली आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची वाढत्या संख्या पाहून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोनाने जिल्ह्यात सर्वच तालूक्यात हातपाय पसरले आहेत. जिल्ह्यातून आज 41 जणांचे स्वॅब तपासणीसाठी लातूरला पाठवले होते. त्यापैकी पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.तर आज पाठवलेल्या अहवालापैकी 35 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. पाटोदा शहरातील एक,धारुर तालूक्यातील एक आणि कारेगाव येथील तीन जणांना कोरोना असल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 61 झाली आहे. त्यापैकी उपचाराखालील रुग्णांची संख्या आता 51 इतकी असून तिघे कोरोनामुक्त झाले आहेत. एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू तर सहा जणांना उपचारार्थ पुण्याला हलविण्यात आले होते.