महाराष्ट्र

‘या’ 6 जिल्यातील कोरोनाचा टक्का घसरला

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप


18 June : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील काही जिल्यात दिलासादायक असं चित्र समोर येत आहे.राज्यात रुग्णाची संख्या आता कमी होण्यास सुरुवात झाली आहे.कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यात रुग्ण वाढीचा दर खाली येताना दिसत आहे .लॉकडाऊन आणि तत्सम नियमांच्या कडक अंमलबजावणीनंतर काही अंशी नियंत्रणात येताना दिसली. हेच चित्र पाहता, अखेर प्रशासनानं टप्प्याटप्प्यानं राज्यात लागू असणारे नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतला.

असं होत असतानाच काही जिल्ह्यांमध्ये मात्र कोरोना रुग्णसंख्येचा आलेख चढताच होता. पण, अखेर या चिंताजनक जिल्ह्यांमध्येही परिस्थिती सुधारत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांमध्ये नियमांची अंमलबजावणी सक्तीनं सुरु असतानाच परिणमार्थ अनलॉ़कनंतरच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. राज्यासाठी ही अत्यंत दिलासादायक बाब ठरत आहे. तर मुंबईतही कोरोना नियंत्रणात येत असल्याचं चित्र आहे. इथं संसर्ग दर कमी झाला असून ऑक्सिजन व्याप्त खाटाच प्रमाण ही घटल आहे.