क्रीडा

या कारणामुळे भारत आणि न्यूझीलंड सामना रद्द

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप


18 June : शुक्रवारी साउथॅम्पट्न येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जात आहे. पावसामुळे पहिल्याच दिवशी सामना होऊ शकला नाही. आयसीसीनेही सामन्यात राखीव दिन ठेवला आहे. जर निकाल 4 दिवसांच्या आत प्राप्त झाला नाही तर राखीव दिवसाचा वापर केला जाईल.वास्तविक आज या सामन्याला सुरुवात होणार होती. परंतु पावसामुळे आजच्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.

उद्या स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार ठीक 3 वाजता) खेळाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. आयसीसीने या सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवला होता. त्यामुळे आयसीसीच्या नियमानुसार हा सामना 19 जून ते 23 जूनदरम्यान खेळवला जाऊ शकतो.दरम्यान, आज संध्याकाळी साऊथॅम्प्टनमधील पाऊस थांबला असला तरी मैदानावर पाणी असल्यामुळे आजच्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ट्विटवरून आजच्या दिवसाचा खेळ रद्द झाल्याची माहिती दिली आहे.

सुरुवातीला केवळ पहिल्या सत्राचा खेळ रद्द करण्यात आला होता. त्यानंतर लंचनंतर खेळाला सुरुवात होईल, असं सांगण्यात येत होतं. परंतु मैदानावर पाणी साचल्यामुळे नाईलाजास्तव आजच्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला.आज सकाळपासूनच साऊथॅम्पटनमध्ये पावसाची रिमझिम सुरु होती. यामुळे नाणेफेकदेखील झाली नाही. मैदानावरील पंचांनी वेळोवेळी खेळपट्टी खेळण्यासाठी योग्य आहे का, याची पाहणी केली. परंतु खेळपट्टी आणि मैदाना दोन्हीही आजचा खेळ खेळण्यासाठी योग्य नसल्याने आजचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दुसऱ्या दिवशी 98 षटकांचा खेळदरम्यान, आता पहिला दिवसाचा खेळ वाया गेल्यामुळे या दिवसाची भरपाई ही राखीव दिवसात केली जाणार आहे. या महामुकाबल्यासाठी 23 जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. तसेच दुसऱ्या दिवशी एकूण 98 षटकांचा खेळ होणार आहे. दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात प्रत्येकी 15 मिनिटं असे एकूण 30 मिनिटं अतिरिक्त खेळ होणार आहे.
अंतिम सामन्यासाठीची टीम इंडियाविराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक) , रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी.1