बीड

बीडमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या ताफा अडवला; पोलिसांचा लाठीचार्जे!

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

18 June : आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे बीड दौऱ्यावर होते.बीडमध्ये सध्या कोरोना रुग्णसंख्याचा एकदा वाढला असताना आज ते बीड जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यासाठी पालकमंत्री व आरोग्यमंत्री यांच्यासमवेत आले होते.बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ताफा आला असता आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्याचे निवेदन देण्यासाठी ताफा अडवला असता त्यांच्यावर पोलिसांनी लाथाचजर्गे केला.कोरोना संकटाच्या काळात आम्हाला कंत्राटी कर्मचारी म्हणून नेमणूक दिली. मात्र तीन महिन्याचा कालावधी पूर्ण होण्याआधीच आम्हाला नोकरीवरुन काढल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना बीडमध्ये मात्र कोरोना रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. मागच्या तीन ते चार दिवसांपासून रोज कोरोना रुग्ण वाढत आहेत. काल जिल्हाभरात तब्बल सव्वा दोनशे कोरोना रुग्ण आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार आणि राजेश टोपे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक घेऊन ते उस्मानाबादकडे निघाले असतानाच आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांचे काही प्रतिनिधी हे अजित पवार यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते, मात्र अचानक आंदोलक गाडी समोर आलेअचानक गाडी समोर आलेल्या आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरु केली यावेळी आंदोलकांना गाडीच्या बाजूला हटवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज सुद्धा केला. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे