आता ही जीवनावश्यक वस्तू होणार स्वस्त केंद्राचा महत्वपूर्ण निर्णय
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
17 June : मागील अनेक दिवसापासून खाद्य तेलाच्या किमतीत भरसमत वाढ होताना दिसत आहे. खाद्य तेलाचे भाव गगनाला भिडले असताना केंद्रातील सरकारने जनतेला दिलासा देनारा निर्णय घेतला आहे .केंद्राने पाम तेलावरील आयात शुल्क कमी केल्याने तेलाच्या किमती कमी होतील असे जाणंकारांचे म्हणणे आहे.केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाने शुल्क कपातीची अधिसूचना जारी केली आहे.
ज्यात क्रूड पाम तेलाचे आयात शुल्क ८६ डॉलर प्रती टनामागे कमी करण्यात आले आहे. या कपातीनंतर एक टन क्रूड पाम तेलावर आता ११३६ डॉलर शुल्क आकारले जाणार आहे.त्याशिवाय क्रूड सोयाबीन तेलाच्या आयात शुल्कात देखील सरकारने प्रती टन ३७ डॉलरची कपात केली असून ते १४१५ डॉलर केले आहे. पाम तेलावरील आयात शुल्क ११२ डॉलरने कमी होऊन ११४८ डॉलर प्रती टन झाले आहे. आयात शुल्कात कपातीमुळे तेल आयातीचा खर्च कमी होणार आहे. यामुळे देशांतर्गत बाजारात पाम तेल आणि सोयाबीन तेलाच्या किमतीत घसरण होण्याची शक्यता आहे.मागील तीन महिन्यात खाद्यतेलांचे दर व उपलब्धता यांचा मेळ पूर्णपणे बिघडला आहे.
भारतात दरवर्षी एकूण गरजेच्या ६० टक्के खाद्यतेल आयात होते. हे प्रमाण २५ ते ३० टक्क्यांनी कमी झाले आहे. यामुळे तीन महिने आधी सरासरी ११० ते १२५ रुपयांदरम्यान असलेले खाद्यतेल आता १८०-२०० रुपयांच्या घरांत गेले आहे. ‘खाद्यतेलाची आयात घटली आहे. खाद्य तेलावर पाच टक्के जीएसटीदेखील आकारला जात आहे. त्यामुळे खाद्य तेल विक्रमी पातळीवर गेले आहे.
सध्या पाम तेलाचा भाव प्रती लीटर १२० ते १३० रुपये आहे. सोयाबीन तेलाचा भाव १४० ते १५० रुपये आहे. सनफ्लॉवर तेलाचा भाव १५० ते १७० रुपये आहे. तर शेंगदाणा तेलाने २०० रुपयांची पातळी केव्हाच ओलांडली आहे.पाम तेलाच्या आयातीवरील शुल्क कपात आज गुरुवार १७ जूनपासून लागू झाली आहे. आयात शुल्कातील कपातीमुळे खाद्य तेलाचा आयात खर्च कमी होईल. परिणामी देशात खाद्य तेल काही प्रमाणात स्वस्त होईल, असे मत जाणकारांनी व्यक्त केलं आहे.