News

खरीप पीक विमा बाबत उद्या टेंडर बीड जिल्ह्याचे उघडणार- वसंतराव मुंडे

परळी (प्रतिनिधी) महाराष्ट्रात खरीप पिक विमा योजनेत खास बाब म्हणून बीड जिल्ह्याचा समावेश करण्यासाठी उद्या टेंडर पुणे कृषी आयुक्त कार्यालयात उघडणार अशी माहिती काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी माहिती दिली  खरीप व रब्बी  पिक विमा योजनेत सन 2019 ते 2020 मध्ये दहा जिल्हे वगळण्यात आले होते त्यामध्ये ते बीड रत्नागिरी सिंधुदुर्ग गडचिरोली चंद्रपूर सोलापूर लातूर हिंगोली वाशिम भंडारा या जिल्ह्यांचा पिक विमा समन्वय समिती मध्ये फेररचना करणेबाबत पिक विमा संदर्भात चर्चा घडवून आणण्यासाठी  दि  5/ 12/ 2019  व  व  26/ 12/ 2019 ला  शासनाकडे  निवेदनाद्वारे  बीड जिल्ह्यासाठी  विशेष बाब म्हणून  पीक विम्याचा सामाविष्ट करण्याबाबत विनंती करण्यात आली होती  त्यावर महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारकडून 26 नोव्हेंबर 2019 ला जिल्हा समूह पर्यायास अंतिम मान्यता देण्याबाबत केंद्र शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला केंद्र शासनाकडून 3 डिसेंबर 2019 ला सूचना प्राप्त झाल्या त्यामध्ये जिल्हा समूहाचे फेररचना करून आपल्या स्तरावर योग्य ते निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले तरीही 4 नोव्हेंबर 2019 निविदा प्रसिद्ध करून 9 डिसेंबरला उघडण्यात निविदा आल्या एकही कंपनीचा बीड जिल्हा संदर्भात सहभाग आढळून आलेला नाही त्यामुळे बीड जिल्हा पीक विमा योजनेतून कायमचाच वगळण्यास संदर्भात विमा कंपनी व शासन स्तरावरून अन्याय जिल्ह्यावर केला जातो की काय असा प्रश्न उपस्थित काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी उपस्थित केला आहे राज्य सरकारकडून कृषी विभागाला अनेक वेळेस मार्गदर्शक सूचना पिक विमा संदर्भात देण्यात आल्या परंतु बीड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी बोगस कागदपत्रे तयार करून बोगस क्षेत्र वाढवून बोगस पिकाचे नोंदी करून करोडो रुपयाचा पिक विमा मधील घोटाळे केल्यामुळे शासन स्तरावर चौकशी मध्ये आधार लिंक केल्यामुळे उघडकीस आलेले आहेत शासनाकडून केस पण दाखल शेतकऱ्यावर केल्या जात आहेत महाराष्ट्र शासन स्तरावर  सर्व बाजूने  पत्रव्यवहार करून  खरीप योजनेत  विशेष बाब म्हणून  बीड जिल्हा  समाविष्ट करण्यासंदर्भात  शासन स्तरावर  हालचाली  करण्यास काँग्रेसचे नेते वसंतराव मुंडे यांनी  प्रयत्न केले  त्यामुळे  यावेळेस  बीड जिल्ह्याचा  विशेष बाब म्हणून  समाविष्ट करून  उद्या  टेंडर  पिक विमा संदर्भात  कृषी आयुक्त कार्यालय पुणे येथे उघडणार आहे या योजनेमध्ये कृषी विभाग महसूल विभाग व बँकेचे कर्मचारी यांच्या चौकशी करण्यात येणार असल्याचे शासन स्तरावर बोलले जात आहे त्यामुळे इमानदार शेतकरी पिक विमा योजनेपासून वंचित राहत आहे व बीड जिल्ह्याची सर्व स्तरावर पिक विमा बाबत बदनामी झाली आहे निसर्गाच्या अवकाळी पावसामुळे गारपीटमुळे खरीप व रब्बी दोन्ही पिकाचे खुप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे तरीही शेतकरी प्रत्येक संकटाला तोंड देतो परंतु शासन स्तरावर मदतीचे पंचनामा करून विनंती केली जाते तरीही शासन स्तरावर दिनांक 30 जानेवारी 2020 ला मंत्री उपसमिती गठीत करण्यात आलेली आहे अशी माहिती कृषी विभागाचे एकनाथ डवले प्रधान सचिव महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई दि 12/3/2020 पत्राद्वारे विनंती करून विशेष बाब म्हणून बीड जिल्ह्याचे पिक विमा योजना संदर्भात खरीप पिकासाठी उद्या निविदा उघडणार असल्याची माहिती काँग्रेस नेते वसंतराव मुंडे चेअरमन श्रम रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी  दिली