महाराष्ट्र

हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

Jun 17 : मान्सून आता महाराष्ट्रातील सर्व भागात जवळपास पोहचला असून अशातच हवामान विभागाने राज्यातील वेगवेगळ्या भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रभर पावसाची शक्यता पुणे, सातारा आणि रत्नागिरीत रेड अलर्ट तर मुंबईत मुसळधार पावसाचा इशारापुणे शहरात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

मात्र, पुणे आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, सातारा आणि रत्नागिरीला आज हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. ठाण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे शहरात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मात्र, पुणे आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन तासात मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यतापुढील दोन तासात मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये सकाळपासूनच चांगला पाऊस बघायला मिळत आहे.

आज काही ठिकाणी अधूनमधून जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून मुंबई, उपनगरे आणि ठाण्यासाठी वर्तवली होती. अरबी समुद्रातील उत्तर कोकणाजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पुढील 2-3 दिवस कोकणात सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मागील 24 तासात कुलाब्यात 102 मिमी, सांताक्रुजमध्ये 31.4 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर आज सकाळी 8.30 पासून सांताक्रुजमध्ये आतापर्यंत 16.1 मिमी पावसाची नोंद, तर कुलाब्यात 13.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दुपारनंतर देखील ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसत आहे.

मराठवाड्यातील परभणी, जालना आणि हिंगोलीत देखील काही ठिकाणी मुसळधार पाऊसकोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरु आहे. सोबतच मराठवाड्यातील परभणी, जालना आणि हिंगोलीत देखील काही ठिकाणी मुसळधार पाऊस वर्तवण्यात आला आहे. विदर्भात देखील हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यात पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाण्यात हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्ध्यांत देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा देखील अंदाज आहेदोन दिवसाच्या ब्रेकनंतर पुण्यात पावसाचं दमदार कमबॅकपुणे शहरात देखील पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. शहरातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाचं दमदार कमबॅक केल्याने काही वेळातच शहरात सर्वत्र सुखद गारवा निर्माण केला आहे.

हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षाही अधिक पावसाचा अंदाज वर्तवला आहे. साधारणपणे 7 जूननंतर मान्सून हजेरी लावत असतो. यंदा मात्र जूनच्या सुरुवातीलाच पावसाने जोरदार बॅटींग सुरू केली. पावसाच्या हजेरीने राज्यातील बळीराजा सुखावला आहे.