कोरोनापासून लहान मुलांना वाचवण्याचा सर्वोत्तम उपाय
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
कोरोनापासून बचावासाठी लस घेणे आवश्यक आहे. तिसऱ्या लाटेपूर्वी आपल्याला पुरेशी तयारी करावी लागेल. , कोरोनापासून बचावासाठी आम्हाला गावातील पारापर्यंत जाऊन लोकांना सांगावे लागेल की लस गरजेची आहेकोविड से बचने का तरीका है, आसान है लगवा लें, टीका है।आप भी महफ़ूज़ होंगे, देश भी, साथ रहने का सलीका है…शक्य तितक्या लवकर लस घ्या. शास्त्रज्ञांनी जिवावर उदार होऊन मानवी वंश वाचवण्यासाठी लस बनवली आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी केवळ लस हाच एकमेव मार्ग दिसत आहे.
विचार करा की, तुम्ही साधी लस घेऊन किती मोठे काम करत आहात. मग मोठ्यांना तर आपल्या घरातील मुलाबाळांसाठी सर्वात आधी पुढे आले पाहिजे आणि लस घेतलीपाहिजे.आम्हाला एखाद्या मोहिमेप्रमाणे लसीकरण करावे लागेल. सध्या जितक्या लोकांना लस दिली जात आहे ती कैक पटीने वाढवावी लागेल. कारण दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक कित्येक पटींनी अधिक धोकादायक राहिली आहे. अशा वेळी तिसऱ्या लाटेपूर्वी आम्हाला पुरेशी तयारी करावी लागेल. मोठ्यांनी लसीकरणाची जबाबदारी जाणली पाहिजे. अन्यथा मुले संक्रमित होऊ लागली तर आम्ही त्रस्त होऊ. ही चळवळ पुढे नेण्यासाठी आम्हाला जेथे कमी शिकलेले किंवा कमी जागरूक लोक आहेत त्या ठिकाणी लक्ष द्यावे लागेल
मला ग्रामपंचायतीपर्यंत असे म्हणायचे आहे. त्यांना सांगा की, पारावर बसून लस कशी गरजेची आहे हे सांगा. कुटुंबाच्या निरोगीपणाबाबत विचार करा. शेजारच्यांना लसीकरणासाठी तयार करा. संकोच करू नका. वस्त्यांतील समित्या, सोसायट्यांनीही पुढे यावे.हेच बघा ना, दुसऱ्या लाटेत मुलांमध्ये कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढली. आधी लहान मुलांची शाळा सुटली, नंतर जिवलग मित्र. आता धोकादायक आजाराचे वाढते भय. हे त्यांच्यासाठी प्रचंड त्रासदायक आहे. त्यांच्या जीवनात आधीच एकटेपण आले होते. मात्र आता हे खूप झाले. त्यामुळे तिसऱ्या लाटेत त्यांना सुरक्षित ठेवण्याची आपलीच जबाबदारी आहे. यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण.
जरा विचार करा, ७-८ वर्षांची मुले विलगीकरण केंद्रात राहतात, ऑनलाइन अभ्यास करतात, अशा वेळी आणि अशा वातावरणात ती कशी मोठी होतील?कुठल्याही मानवी स्पर्शाविना मोठी होत असलेली ही मुले.. खरंच कठीण आहे. कुणाचे मूल जर आजारी पडले तर त्याला एकटे कसे ठेवायचे? छोटे बाळ, तेही आईवडिलांपासून दूर, बहीण-भाऊही जवळ येऊ शकत नाहीत.. अशा दृश्याचा विचारही केला तरी मन थरथर कापायला लागते. केवळ मुलांना सुरक्षित ठेवण्याविषयी आपण बोलू शकत नाही तर लस देण्यावरही भर द्यायला हवा.
आमचे मुंबईचेे डॉ. जलील पारकर कोरोनातून वाटचाल करत आहेत. हे लोक आपल्या अनुभवातून सांगत आहेत की, लस आवश्यकच आहे.हे आपले जीवन आहे. पुढाकार घेऊन तुम्ही लस घ्या. कारण, हे आपले जीवन आहे. प्रत्येक गोष्टीत सरकारवर विसंबून राहता येणार नाही. सरकार दारी येईल, मग आपण जिवंत राहू, असे आपण म्हणू शकत नाही. आपल्याला मुले, कुटुंब, आप्तेष्ट, निकटवर्तीय या सर्वांनाच लस द्यावयाची आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी हाच एकमेव उपाय आहे… ताे म्हणजे लसीकरण. ’; जाणून घ्या 2022 मध्ये काय-काय बदलणार.