पावसाचं पाणी साखर कारखान्यात; 30 हजार साखरेचे पोते पाण्यात
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
16 Jun :- बीडच्या केज तालुक्यातील येडेश्वरी साखर कारखान्याच्या गोदामामध्ये पावसाचं पाणी शिरल्याने, 30 हजार साखरेचे पोते पाण्यानं भिजली आहेत. यामध्ये पंधरा हजार क्विंटल साखर भिजल्याने लाखोंचं नुकसान झालंय.
येडेश्वरी साखर कारखान्याने यंदा सहा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केलं होतं. आणि हीच साखर पॅकिंग करून गोदामात स्टोअर करण्यात आली होती. मात्र, मागील दोन दिवसात झालेल्या पावसाने कारखान्याच्या गोदामातील सर्व साखर भिजून गेलीय. गोदामातील पाणी काढण्यासाठी 40 ते 50 कामगार प्रयत्न करत होते. अर्ध्या तासात 130 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. सध्या पाणी काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरूच आहेत.