बीड

बीड- कार, ट्रॅव्हल्सच्या धडकेत ग्रामसेवक जागीच ठार

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

16 Jun :- भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हल्सने कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ग्रामसेवक ठार झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी वडवणी जवळ घडली. वडवणी तालुक्यातील देवडी येथील राजेंद्र मुंडे हे बीड पंचायत समितीत ग्रामसेवक आहेत.

बुधवारी सकाळी ते आपल्या कारने आपल्या कांही कामानिमित्त जात असताना वडवणी जवळ समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रॅव्हल्सची समोरासमोर जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात ग्रामसेवक राजेंद्र मुंडे हे जागीच ठार झाले. यात मुंडे यांच्या गाडीचा अक्षरशः चुराडा झाला. घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली.