भारत

धक्कादायक! आता हिरवी बुरशीचाही रुग्ण आढळला

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

  16 June : सध्या कोरोनाच्याया  वाढत्या काळात विविध बुरशीजन्य आजार बळावत आहेत .पांढरी बुरशी ,काळी बुरशी ,पिवळी बुरशी अशा अनन्य प्रकारचे रोग निर्माण होत आहेत. अशातच मध्यप्रदेशातील इंदूर शहरात  हिरव्या बुरशीचा भारतातील पहिला रुग्ण आढळला . मध्य प्रदेशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या इंदूर शहरात पोस्ट कोविड रुग्णांची वाढही मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. इंदूरच्या शासकीय व खासगी रुग्णालयात काळ्या बुरशीचे 500 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर आता इंदूरमध्ये हिरव्या बुरशीच्या रुग्णाचे निदान झाले आहे. देशातील ही पहिली घटनकोरोनाच्या दुसर्‍या लाटेने इंदूरमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले. ही रुग्णसंख्या आता हळूहळू कमी होत आहे. मात्र आता इंदूरमध्ये नव्या हिरव्या बुरशीजन्य संसर्गाने चिंता वाढली आहे.

 कोरोनानंतर काळ्या, पांढर्‍या आणि पिवळ्या बुरशीचे प्रकार आढळले आहेत. पण आता इंदूरमध्ये देशातील अशी पहिली घटना समोर आली आहे, ज्यामध्ये 90 दिवसांच्या उपचारानंतर रुग्णाला हिरव्या बुरशीची बाधा झाली आहे.फुफ्फुसात हिरव्या बुरशीचे निदानआरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. अपूर्व तिवारी यांनी सांगितलं की , वैद्यकीय आणि आरोग्य विभागाला इंदूरच्या अरबिंदो रुग्णालयाकडून अहवाल मिळाला आहे. ज्यात तज्ज्ञ डॉ. रवी दोशी यांनी सांगितले की, 34 वर्षीय विशाल श्रीधर हे दीड महिन्यापासून अरबिंदो रुग्णालयात उपचार घेत होते.  परंतु त्यांचे 90 टक्के फुफ्फुस निकामे झाले होते. त्याच्यावर सर्व शक्य उपचार केले जात होते.

 जेव्हा त्याच्या फुफ्फुसांची तपासणी अरबिंदो हॉस्पिटलमध्ये केली गेली तेव्हा असे आढळले की रुग्णाच्या फुफ्फुसात हिरवी बुरशी आहे. ज्याला म्युकर म्हणता येणार नाही, असं डॉक्टरांनी सांगितले हिरव्या रंगामुळे या बुरशीला ग्रीन फंगस असे नाव देण्यात आले आहे. डॉ अपूर्व म्हणाले की, देशातील ही पहिली घटना आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या फुफ्फुसात हिरवी बुरशी आढळली आहे. विशाल श्रीधर नावाच्या रुग्णाला खासगी चार्टर्ड प्लेनमधून मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये रेफर केले गेले आहे. डॉ. रवी दोशी मुंबईच्या डॉक्टरांशी सतत संपर्कात राहून रुग्णाच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहेतदुसरीकडे, रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या अरबिंदो रुग्णालयाचे डॉ. रवी दोशी यांनी सांगितले की, हिरवी बुरशी रुग्णाच्या सायनसमध्ये फुफ्फुसात रक्तामध्ये आढळली आहे. 

कोविडचा रुग्ण असल्याने त्याच्या फुफ्फुसाचे आधीच नुकसान झाले होते. डॉ.  रवी दोशी पुढे म्हणाले की, एस्परगिलसच्या लक्षणांबद्दल बोलायचे तर नाकातून रक्तस्त्राव होणे, नाक बंद होणे, सर्दी, डोकेदुखी आणि ताप यासारखी अनेक लक्षणे आढळतात. कोरोना उपचारादरम्यानची ही पहिली घटना ज्यामध्ये अशी लक्षणे समोर आली आहेत. हे कोरोना आणि म्यूकरमाकोसिस एवढेच घातक आहे. यापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने असे म्हटले होते की कोणत्याही रंगाच्या नावाने बुरशीला ओळखले जाऊ नये.