जुगार आड्ड्यावर छापा
पोलीस पथकाचा कड्यात जुगार आड्ड्यावर छापा
दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
आष्टी (प्रतिनिधी)आष्टी तालुक्यातील कडा येथे पोलीस उपअधीक्षक विजय लगारे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळल्यावरून कडा येथील खेडकर वस्ती येथे शेतात पत्राच्या शेडमध्ये आठ इसम तिरट नावाचा जुगार खेळत असताना दि.२५ मे रोजी दुपारी छापा टाकून रंगेहाथ पकडण्यात आले. सहा मोबाईल, सहा मोटार सायकल,रोख रक्कम असे २ लाख ३ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलीस शिपाई रामनाथ शिनगारे यांच्या फिर्यादीवरून जुगार कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायदा अन्वये कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.ही कार्यवाही पोलीस उपअधीक्षक विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलीस उपनिरीक्षक संदीप यादव व पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने केली आहे.