कोणताही घोटाळा नाही हे राजकीय षडयंत्र राम मंदिर ट्रस्ट.
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
त्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी रामच्या नावावरुन जोरदार राजकारण सुरु झाले आहे. यापूर्वीचे राजकारण हे राम मंदिराच्या जमिनीवरुन केले जात होते. परंतु, आताचे राजकारण हे ट्रस्टने मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमिनीवरुन होत आहे. ट्रस्टने दोन कोटींची जमीन 10 मिनटांत 18.50 कोटी रुपयाला खरेदी कशी केली यावरुन देशातील विरोधी पक्ष भाजप आणि योगी सरकारवर हल्लाबोल करत आहे. यामुळे श्रीराम जन्म भूमी ट्रस्ट जमीन खरेदीच्या व्यवहारावरुन वादाच्या भोवर्यात अकडले आहे.
याच पार्श्वभूमीवर ट्रस्टने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला एक अहवाल पाठवला आहे. ज्यामध्ये जमीन खरेदी व्यवहाराची सविस्तरपणे माहिती दिली गेली असल्याचे ट्रस्टने सांगितले आहे. ट्रस्ट पुढे म्हणाले की, संबंधित प्रकरणात कोणाताही घोटाळा झाला नसून भाजपच्या विरोधी पक्षाचे हे आमच्याविरुद्धचे राजकीय षडयंत्र आहे.
ट्रस्टने जमीन खरेदीसंदर्भात काही तथ्ये जारी केले
राम मंदिर ट्रस्टने असा दावा केला आहे की, खरेदी करण्यात आलेली जमीन मुळ ठिकाणी असल्यामुळे त्याची किंमत जास्त आहे. या जागेची किंमत प्रति चौरस फूट 1,423 रुपये असून ती इतर जागेपेक्षा खूपच कमी आहे. या जमिनीच्या करारासंदर्भात 10 वर्षांपासून चर्चा सुरू आहे, ज्यामध्ये 9 लोकांचा सहभाग असल्याचे ट्रस्टने सांगितले. ते पुढे म्हणाले की, पहिल्या दिवशी जे निश्चित झाले होते अगदी तसाच व्यवहार करण्यात आला असून सर्व रक्कम खात्यात दिली गेली.
ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी फेटाळले आरोप
- या जागेचा जमीन मालकीचा निर्णय खूप महत्वाचा असल्यामुळे तो करण्यात आला आहे. दरम्यान, या जमिनीचा करार करण्यात आला असून त्याचा बाँड बाकी आहे.
- संबंधित प्रकरणाचे सर्व व्यवहार बँके टू बँक झाले असल्यामुळे यामध्ये कोणतीही कर चोरी करण्यात आली नाही.
- आरोप करण्यार्यांनी आरोपापूर्वी ट्रस्टच्या अधिकार्यांकडे वस्तुस्थितीची चौकशी केली नाही.
सुलतान म्हणाले – करार वैद्य
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला बाग बिजेसरची जमीन देणारे सुलतान अन्सारी यांनी भास्करशी संवाद साधला. संबंधित प्रकरणात ते फरार नसून अयोध्येत सुरक्षित असल्याचे सुलतान म्हणाला. तो पुढे म्हणाला की, या जमिनीचा खरेदी व्यवहार वैद्य असून तो सध्याच्या बाजार भावापेक्षा कमी आहे.
या कारणांमुळे 2 कोटींची जमीन 18.5 कोटी रुपयांत मिळाली
ट्रस्टचे म्हणणे आहे की, सुलतान अन्सारी आणि रवि मोहन तिवारी यांनी सुमारे 10 वर्षांपूर्वी कुसुम पाठक आणि हरीश पाठक यांच्याकडून बाग बिजेसरची जमीन खरेदी केली होती. त्यानुसार त्याचा दर दोन कोटी रुपयांत निश्चित करण्यात आला होता व याची नोंददेखील करण्यात आली होती. ज्यावेळी मंदिराने ही जमीन विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा सुलतान अन्सारी आणि रवि मोहन तिवारी यांनी पाठक कुटुंबिंयाकडून 18 मार्च 2021 रोजीच्या बाजार भावाने दर निश्चित केले व आजच्या दरानुसार ते मंदिर ट्रस्टला विकले. त्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा झाला नसून फक्त रामभक्तांना दिशाभूल करण्यासाठी हे राजकीय षडयंत्र असल्याचे रॉय म्हणाले.
मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरातील जमिनीची ट्रस्टकडून खरेदी
- राम मंदिर ट्रस्टला केंद्र सरकारकडून 70 एकर जमीन मिळाली आहे.
- ट्रस्टने मंदिर विस्ताराची योजना आखली असून यासाठी 108 एकर जमिन लागणार आहे. यापूर्वी मंदिर संकुल 3 एकरात होते ते आता 5 एकरात बांधले जाईल.
- मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरातील सुमारे 70 एकर जमीन खरेदी केली जात आहे.
- अलीकडेच ट्रस्टने जवळ पासची दोन मंदिरे 4-4 कोटींमध्येही खरेदी केली आहेत.
- ज्या लोकांकडून या जमिनी घेतल्या जात आहेत, त्या लोकांनाही इतरत्र जागा देण्यात येत