व्हॅक्सिननंतर 68 वर्षीय व्यक्तीला अॅलर्जी झाली, यामुळेच मृत्यू झाला
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
Jun 15: भारतात कोरोना लसीमुळे 68 वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. शासनाने गठीत केलेल्या समितीने यास दुजोरा दिला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एका 68 वर्षीय व्यक्तीला 8 मार्च रोजी लसीचा डोस देण्यात आला होता, त्यानंतर व्यक्तीमध्ये अॅनाफिलेक्सिससारखे दुष्परिणाम दिसून आले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. ही एक प्रकारची ऍलर्जिक रिअक्शन असते. यामुळे, शरीरात फार वेगाने पुरळ दिसून येतात
31 मृत्यूच्या मूल्यांकनानंतर पुष्टी
लसीकरण झाल्यानंतर एखादा गंभीर आजार किंवा मृत्यू होणे याला वैज्ञानिक भाषेत अॅडवर्स इव्हेंट फॉलोइंग इम्युनाइझेशन म्हणतात. केंद्र सरकारने साठी समिती गठीत केली आहे. या समितीने लसीकरणानंतर 31 मृत्यूंचे मूल्यांकन करून पहिल्या मृत्यूची पुष्टी केली आहे.
आणखी दोन व्यक्तींमध्ये अॅनाफिलेक्सिसची लक्षणे दिसली
रिपोर्टसार, समितीचे अध्यक्ष डॉ. एनके अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, दोन आणखी लोकांना लस दिल्यानंतर अॅनाफिलेक्सिसची समस्या दिसून आली. त्यांचे वय 20 वर्षांच्या जवळपास होते . मात्र, रुग्णालयात उपचारानंतर दोघेही पूर्णपणे बरे झाले होते. त्यांना 16 आणि 19 जानेवारी रोजी लस देण्यात आली होती. डॉ. अरोरा यांनी या संदर्भात आणखी काही बोलण्यास नकार दिला आहे.