गेवराईत भर दुपारी पत्नीचा पतीने दगडाने ठेचून केला खुन
गेवराईत भर दुपारी पत्नीचा पतीने दगडाने ठेचून केला खुन
या प्रकरणी पतीला पोलिसांनी अटक केली
गेवराई शहरातील जायकवाडी वसाहत वाणी मंगल कार्यालय परिसरात गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास गंधारीबाई बप्पासाहेब घुले (वय ५०) रा.गेवराई या महिलेचा तिचा पती बप्पासाहेब घुले यांनी घरगुती कारणावरुन गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास दगडाने व कु-हाडीच्या दांड्याने घरातच खुन केला आहे.या घटनेने गेवराई शहरात खळबळ उडाली आहे.दरम्यान सदरील पतीस गेवराई पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अटक केली आहे.
(SSC मध्ये ५८४६ जागांची भरती २०२०)
घटनास्थळी पोलिस उपविभागीय आधिकारी स्वप्नील राठोड,पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे,पोलिस उपनिरीक्षक मनिषा जोगदंड,युवराज टाकसाळ सह कर्मचारी यांनी भेट दिली आहे.दरम्यान ज्या व्यक्तीने पत्नीचा खुन केला तो बप्पासाहेब घुले हा मनोरुग्ण आसल्याचे या परिसरातील नागरिकांनी आमचे प्रतिनिधी कैलास हादगुले यांच्याशी बोलतांना सांगितले आहे.सदरील महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे.पुढील तपास गेवराई पोलिस करत आहे