बायकोच्या अंगावर रॉकेल टाकून केला जीवंत जाळण्याचा प्रयत्न
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
13 Jun :- वांग्याची भाजी का केली नाही म्हणून पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे. पीडित महिलेवर उदगीर येथे उपचार सुरु आहेत. याबाबत उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील हेर या गावात धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ कौटुबिक वादातुन महिलेस जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाला आहे.
फरजाना शादुल शेख असे पीडित महिलेचे नाव आहे. ही महिला नवरा शादुल शेख याच्या त्रासास कंटाळून गेली आहे. हा दारूच्या व्यसनापायी वाया गेला आहे. सकाळी पत्नीबरोबर भांडण करून तो घराबाहेर गेला होता. रात्री घरी आल्यानंतर त्याने दारूच्या नशेत फरजानाला मारहाण करायला सुरुवात केली. वांग्याची भाजी का केली नाही असं विचारत त्यानं तिला बेदम मारहाण केली.
घरातील रॉकेल फरजानाच्या अंगावर टाकून तिला पेटवून देण्याचाही प्रयत्न केला. या घटनेत फरजाना मोठ्या प्रमाणात जखमी झाली आहे. उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात फरजानावर उपचार सुरू आहेत. याबाबत फरजानाच्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.