बीड

केक, पेस्ट्रीमधून ड्रग्सची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

13 Jun :- नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने एनसीबी मुंबईतील मालाड येथील बेकरीवर छापेमारी केली आहे. या छाप्यादरम्यान चकीत करणारे खुलासा समोर आले आहे. या बेकरीत केक आणि पेस्ट्रीमध्ये ड्र्ग्स विकले जात होते. बेकरीच्या माध्यमातून असे ड्रग रॅकेट उघडकीस येण्याची ही पहिलीच वेळ आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. अशाप्रकारे बेकरी व्यवसायाच्या आडून ड्रग्सची विक्री केली जात असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. छापेमारी दरम्यान येथून 160 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

केकमध्ये ड्रग्स भरून ते हाय प्रोफाइल भागात विकले जात होते. हा ड्रग्सचा धंदा कधीपासून सुरु होता याची चौकशी एनसीबी करत आहे. या बेकरीचे ग्राहक कोण आहेत आणि याचा मास्टर माइंड कोण आहे याचा शोध सुरु करण्यात आला आहे. सध्या तरी एनसीबीने दोन जणांना अटक केली आहे. मुंबईतील ड्रग्ज प्रकरणावर एनसीबी सातत्याने कारवाई करत आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात 14 जून 2020 रोजी बॉलिवूड-ड्रग्स माफिया चौकशी प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक आणि इतर 33 जणांविरूद्ध 12,000 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (एनसीबी) मुंबई झोनल युनिटने एप्रिलमध्ये अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या चरित्रात लपलेल्या ड्रग्सची एक खेप जप्त केली होती. पुस्तकाची तपासणी केल्यावर एलएसडीच्या 80 बोल्ट्सची मात्रा जप्त करण्यात आली. एलएसडी काही युरोपियन देशांमधील काही तरुणांनी डार्क नेटद्वारे विकत घेतले होते आणि बिटकॉइन सारख्या क्रिप्टो चलनांद्वारे याचे पेमेंट केले गेले.