बीड

नवराच्या अनैतिक संबधाला अडसर ठरणाऱ्या बायकोस जबर मारहाण

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

11 Jun :- गेवराई तालुक्यातील बंगाली पिपळा नजिक बेलानाईक तांडा येथे रंजना अरविंद राठोड (पत्नी) हिस नवरा अरविंद विठ्ठल राठोड,सासु कमलबाई विठ्ठल राठोड जाऊ अर्चना नितीन राठोड व अशोक संपत राठोड यांनी विधवा जाऊ व नवराच्या अनैतिक संबधाला अडसर ठरणाऱ्या बायको वर अनैतिक अत्याचार करत कवडगांव शिवारात एका शेडवर जबर मारहाण करत हातपाय बांधून टाकुन दिले, हि माहीती सकाळी दि,११ शुक्रवार रोजी शेतवर आसणार्या लोकांनी पाहील्या नंतर पिडीत महीलेची सुटका केली.

दोन दिवसा पुर्वीच मुलिचीआई शोभाबाई काळु जाधव पैळाचीवाडी हिने माझी मुलगी गायब आसल्याची तक्रार चकलंबा पोलिसात दाखल केली होती, पोलिसांनी वेळीच दखल घेतली आसती तर हा अनर्थ टळला आसता,अशी चर्चा सुरु आहे. या बाबत वृत्त असे की, गेवराई तालुक्यातील बंगाली पिपळा नजिक बालनाईक तांड्यावर एक विवाहीत महिलेवर नवरा, सासु, जाऊ व एका नातेवाईकांनी अनैतिक अत्याचार करत अनैतिक संबधाला अडसर ठरणाऱ्या बायकोला जबर मरहाण करत मोठ्या सोलिने हातपाय बांधत पळ काढला, शेतावरील आजुबाजुच्या शेतकऱ्यांनी सकाळी हा प्रकार पाहाताच संबधित पिडीत महिलेची सुटका केली, दोनच दिवसापुर्वी पिडीत विवाहीतच्या आईने चकलंबा पोलिसात माझी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.

पिडीत महिलेल्या उपचारासाठी गेवराई येथिल ग्रामीण रग्णालयात दाखल केले आसता,या ठिकाणी दाखल करुन घेतले नाही,त्यामुळे बीड येथिल जिल्हा रुग्णालयात दाखल केले असुन, संबधित महिलेनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे, कि, माझा नवरा अरविंद विठ्ठल राठोड हा माझी विधवा जाऊ अर्चना नितिन राठोड हिचे गेली दोन वर्षा पासुन सर्रास अनैतिक संबध आहेत, त्यामुळे मी अडचर ठरत असल्याने मला सतत मानसिक, शारिरीक छळ केला जात असे,तु आईवडिलां कडे जा तुझी मला गरज नाही असे माझा नवरा मला म्हणत असे पंरतु माझ्या आईवडिल मजुरी करुन उपजिविका भागवत असल्याने मी माहेरी गेले नाही.

मला तिन मुले आहेत, वेळोवेळी नातेवाईक यांनी माझा नवर्याला समज देवुनही काहीच उपयोग झाला नाही,त्यामुळे मला कवडगांव शिवरातील शेत वस्तीवर असणाऱ्या एका शेडवर रात्रीच उपाशीपोटी अनुन अनैतिक कृत्य करत मला जबर मारहाण करत मोठ्या सोलिने हातपाय बांधुन गळ्याळा रुमला बांधुन बेशुध्द आवस्थेत सुडुन गेले, परंतु माझे आयुष्य बलवान म्हणुन मी जगले, या सर्व घटना नवरा अरविंद विठ्ठल राठोड,सासु कमलबाई विठ्ठल राठोड जाऊ अर्चना नितीन राठोड व अशोक संपत राठोड यांनी नियोजन बंध घडविली आहे.