नेकनूरमध्ये बिबट्याचे दर्शन
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
11 Jun :- बीडपासून जवळच असलेल्या नेकनूरमधील कळसंबर शिवारात बिबट्याचे दिसून आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गावकऱ्यांना आगोदर वाघ असल्याचे वाटल्याने सर्वांनी वाघ पाहण्यास गर्दी केली मात्र नंतर पोलिसासह वन विभागाची टीम पाचारण केल्यानंतर तो बिबट्या असल्याचे उघड झाले तर कळसंबर शिवारातील आजिनाथ वाघमारे या ४० वर्षीय शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात आजिनाथ वाघमारे जखमी झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
११ जुन रोजी शुक्रवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास कळसंबर येथील गोरख वाघमारे यांच्या ऊसाच्या शेतात बिबट्या दिसून आला. या ठिकाणी गावकऱ्यांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच एपीआय लक्ष्मण केंद्रे, पोलीस कॉन्स्टेबल खाडे, खांडेकर, डोंगरे यांनी धाव घेऊन शेतातील नागरिकांना दूर केले. या घटनेने गावकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली असून अनेक गावात भितीचे वातावरण पसरले आहे.