News

आष्टी ग्रामीण रुग्णालयात अ‍ॅडमिट न केल्याने रुग्णाचा मृत्यू ?


आष्टी ( प्रतिनिधी ) आष्टी तालुक्यातील क-हेवाडी येथील सुरेश गायकवाड यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना उपचारासाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात अ‍ॅडमिट करुन न घेतल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप पत्नी लंकाबाई सुरेश गायकवाड यांनी जिल्हाधिकारी बीड यांना दिलेल्या म्हटले आहे.आष्टी तालुक्यातील क-हेवाडी येथील सुरेश रामभाऊ गायकवाड यांना दि.१८ मे रोजी हृरदयविकाराचा झटका आल्याने आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता अ‍ॅडमिट करुन न घेता शरीराच्या तपासणीचे यंत्र आमच्याकडे नाही बाहेरून तपासून आणा आम्ही उपचार करतो माझ्या पतीला खुप वेदना होत असताना अ‍ॅडमिट करुन घेतले नाही लाॅकडाऊनच्या काळात आम्हाला काही सुचत नव्हते त्यातच आर्थिक परिस्थिती बिकट होती लाॅकडाऊनमुळे हाताला काम नाही,पैसा नाही अशातच माझ्या पतीचा मृत्यू झाला आहे.माझ्या पतीवर वेळेवर उपचार केले असते तर कदाचित ते जिवंत राहिले असते माझ्या घरातील एकमेव कर्ता कमविता व्यक्ती गेल्याने कुटुंबावर आर्थिक परिस्थिती ओढवली असून मला चार मुली एक मुलगा आहेत.आमच्या कुटुंबावर बिकट परिस्थिती आली आहे म्हणुन कुटुंबास आर्थिक मदत द्यावी अशी मागणी लंकाबाई सुरेश गायकवाड यांनी केली आहे.