बीड

शेततळ्यात बूडुन तिघांचा दुर्दैवी मृत्यु

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

10 Jun :- गेवराई तालुक्यातील दैठण येथील शेतातील शेततळ्यात बूडुन तिघांजनाचा मृत्युु झाला असल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी ४ च्या दरम्यान घडली आहे.दरम्यान आठ दिवसापूर्वीच याच भागातील मिरगाव येथे तीन जणांचा मृत्यू गोदावरी नदी पाञात बुडून झाला होता.दैठण येथील झालेल्या घटनेमुळे या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.एकंदर गेवराई तालुक्यातील गोदावरी नदी पाञात व पैठणच्या उजव्या कालव्यात पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटना अधिक वाढू लागल्याने चिंतेचा विषय झाला आहे.

या बाबत अधीक माहिती अशी कि, गेवराई तालुक्यातील दैठण येथील सुनिल जग्गनाथ पंडित वय ४० वर्ष,राज सुनिल पंडित वय १२ वर्ष व भाचा आदित्य पाटील रा.शेवगाव जिल्हा अहमदनगर एकूण मिळुन तीन जनांचा शेततळ्यात बूडुन मृत्यू झाला आहे.तसेच आपल्या शेतात शेतळ्यात पाणी असल्याने पोहण्यासाठी दोन मुले गेली व पोहत असतांना ते बूडु लागली परंतू त्यांना वाचवण्यासाठी गेलेले वडिल त्यांचा देखील यात दुर्दैवी अंत झाला आहे.घटनास्तळावर पोलीसांनी पंचनामा केला असुन शवविछेदन करण्यासाठी गेवराई उपजिल्हा रूग्णलयात आनण्यात आले आहे.सदरील घटना गुरुवारी सांयकाळी पाचच्या दरम्यान दैठण परिसरात त्यांच्या शेत परिसरात घडली आहे.या घटनेने दैठण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान मागिल अनेक वर्षांपासून गेवराई तालुक्यातील गोदावरी नदी पाञात व पैठणच्या उजव्या कालव्यात पाण्यात बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढते असुन प्रशासनाने यावर लगाम घालण्यासाठी जे आपल्या पातळीवर नियम करता येथील ते करणे आता आवश्यक झाले असुन यावर लगाम न घातल्यास शोकडो नागरिकांचे भविष्यात बळी जातील हे संकेत आता दिसुन येत आहे.त्यामुळे गोदावरी नदी पाञ व पैठणच्या उजव्या कालव्या अंतर्गत येणा-या या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी आपले आंग झटकून हे बळी जाण्यासाठी पायबंद करावे अशी मागणी होत आहे.दरमजान सरकारचे लाखो रुपये पगार घेऊन हे आधिकारी व कर्मचारी काम करत नसतील तर त्यांना आम्ही यापुढे गोदावरी व पैठणच्या उजव्या कालव्यात कुणाचा मृत्यू झाल्यास जवाबदार ठरवू असा इशारा देखील गोदावरी नदी काठच्या गावातील नागरिकांमधून दिला जात आहे.