बीड

बीड- शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गीते यांची उचलबांगडी

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

10 Jun :- बीड जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. गित्ते यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्याकडे लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयाची जबाबदारी दिली आहे. बीड जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा प्रभारी चार्ज माजलगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. साबळे यांना देण्यात आला आहे. डॉक्टर गीते यांच्या जागी डॉक्टर साबळे हे आज दिनांक 10 जून रोजी शल्यचिकित्सक पदाचा पदभार घेणार असून ते माजलगावकडून बीडकडे रवाना झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.