बीड

गर्दी वाढू लागली, रुग्णसंख्या वाढू लागली!

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

10 Jun :- बीड जिल्ह्यात निर्बंधांमध्ये काहीशी मोकळिकता मिळताच गर्दी वाढू लागल्याने आज कोरोनाचा आलेख पुन्हा वरती जाऊ लागला आहे. कोरोना विषयक नियमांचे पालन न केल्यास येणाऱ्या काळात आणखीन कोरोनाच संकट वाढू शकत हि बाब प्रत्येकाने लक्षात घेणं गरजेचं आहे.

बीड जिल्ह्यात आज दि 10 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3445 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 168 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3277 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 19 आष्टी 25 बीड 33 धारूर 6 गेवराई 15, केज 25 माजलगाव 12 परळी 9 पाटोदा 5, शिरूर 14 वडवणी 5 असे रुग्ण आढळून आले आहेत.