पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जारी
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
9 Jun :- आज पावसानं मुंबईला चांगलंच झोडपून काढलं आहे. पहिल्या पावसातच मुंबईची तुंबई झालेली पाहायला मिळाली. मुंबईसह ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागानं हा हाय अलर्ट दिला आहे. पुढचे 3 ते 4 तास अतिवृष्टी होणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.प्रतितास 2 ते 3 सेंटीमीटर पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून गेल्या तीन तासात रेकॉर्डब्रेक पाऊस झाला आहे. सांताक्रूझमध्ये 164.8 मिमी, कुलाबामध्ये 32.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
कोकण किनारपट्टीच्या काही जिल्ह्यांसाठी यलो आणि रेड अलर्ट कोकण किनारपट्टीच्या काही जिल्ह्यांसाठी यलो आणि रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज मुंबईसाठी रेड अलर्ट आणि पुढील 4 दिवस यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टी येथे पुढील चार दिवस मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडी मुंबईच्या शुभांगी भुते यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे.
मुंबईतील पावसाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थेट मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रूममध्ये पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. आढावा घेतल्यानंतर योग्य त्या सूचना प्रशासनाला दिल्यात. राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ठिकठिकाणी पाणी तुंबले आहे. दुपारी 3.10 च्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई पालिकेच्या कंट्रोल रुममध्ये पोहोचले. परिस्थितीचा आढावा घेतला.