बीड

आज रुग्णसंख्या अत्यंत कमी; मात्र वाढती गर्दी चिंताजनक

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

7 Jun :- बीड जिल्ह्यात आज सोमवारपासून अनलॉक प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी अनलॉक प्रक्रियेमुळे बाजारपेठांमधील वाढती गर्दी पुन्हा एकदा रुग्णसंख्येचा आलेख उंचावू शकते म्हणून प्रत्यकाने काळजी घेणे आणि स्वयंशिस्तीचे पालन करणे गरजेचे आहे. बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा सोमवारी केवळ दिडशेच्या घरात राहिला.

यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे आष्टी तालुक्यातील आहेत. तर सर्वात कमी रुग्ण हे परळी आणि माजलगाव तालुक्यातील आहेत. बीड जिल्ह्यातील 2845 रुग्णांची तपासणी केली असता त्यातील 155 पॉझिटिव्ह तर 2690 रुग्ण निगेटिव्ह आले आहेत .ज्यामध्ये अंबाजोगाई 18, आष्टी 35, बीड 20, धारूर 11, गेवराई 13,केज 21, माजलगाव 3, परळी 3, पाटोदा 5, शिरूर 19 आणि वडवणी मध्ये 7 रुग्ण आढळून आले आहेत.