जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
6 Jun :- हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांनी प्रकृती अस्वास्थामुळे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबाबत एमाहिती दिली. त्या म्हणाल्या की, “दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि त्यामुळेच त्यांना आज सकाळी साडेआठ वाजता मुंबईतील खार येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे नॉन कोविड रुग्णालय आहे.
डॉ. नितिन गोखले यांच्या देखरेखीखाली दिलीप कुमार यांच्या सगळ्या चाचण्या करण्यात येत असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तुम्ही सर्वजण त्यांच्यासाठी प्रार्थना करा की, ते लवकर ठिक होवोत.”डिसेंबर 2020 पासूनच दिलीप कुमार यांची नाजूक आहे. अशातच सायरा बानो यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना आज सकाळी रुग्णालयातच दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांची प्रकृती नाजूक आहे, तसेच त्यांची रोगप्रतिकार शक्तीही कमी आहे. यापूर्वीही दिलीप कुमार यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी सायरा बानो यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यास चाहत्यांना सांगितलं होतं.